उमर यांनी घेतली सर्व पक्षीय बैठक   

जम्मू : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी गुरूवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीस नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला, डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) प्रमुख गुलाम नबी आझाद, जम्मू-कश्मीर काँग्रेसचे प्रमुख तारिक हमीद कर्रा, अपनी पार्टीचे अध्यक्ष अल्ताफ बुखारी, पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख साजाद लोन आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे (पीडीपी) मेहबूब बेग उपस्थित होते. याशिवाय, भाजप, जेडीयू, सीपीआय (एम), अवामी इत्तेहाद पार्टी (एआयपी), पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीएफ), अवामी नॅशनल कॉन्फरन्स (एएनसी), आम आदमी पार्टी (आप) आणि नॅशनल पँथर्स पार्टी (एनपीपी) यासह इतर राजकीय पक्षांचे नेतेही उपस्थित होते.

Related Articles